Jain NewsSend news to news[a]jainjagruti[dot]in

News for March, 2013

राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषिजी म.सा. यांचा दीक्षा शताब्दी वर्ष 2012-13 सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने 21 मार्च रोजी आयंबिल दिन, 28 मार्च 21 वा स्मृती दिन व 31 मार्च रोजी संपूर्ण भारतात विशाल रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. ;

श्री. प्रीतिसुधाजी म.सा. कैंसर केयर सेंटर चे नाशिकयेथे 1 जानेवारी रोजी उद्घाटन झाले. यावेळी साध्वी श्री प्रीतिसुधाजी, श्री. मधुस्मिताजी, श्री.प्रकाशजी दायमा, दशरथजी पाटील, श्री. हुकुमचंदजी बागमार, श्री. विरेंद्रकुमार जैन इ. उपस्थित होते. ;

मुंबई येथील उद्योगपती व समाजसेवक श्री. सुभाषचंद्रजी रूणवाल व सौ. चंदा रूणवाल यांना जितो तर्फे ‘‘जीतो एक्सलन्स अ‍ॅवार्ड’’ 27 जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमात देण्यात आला. यावेळी श्री. अजित रांगणेकर, श्री. मोफतराज मुनोत, श्री. नरेंद्रजी बलदोटा इ. मान्यवर उपस्थित होते. ;

ओसवाल बंधु समाज पुणे यांनी बिबवेवाडी परिसरात श्री वर्धमान सांस्कृतिक केंद्र निर्माण केले. याचे द्घाटन 9 फेब्रुवारी रोजी झाले. या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य चे सचीव श्री. जयंतकुमार बांठीया, न्यायाधीश श्री. कमलकिशोर ताथेड, श्री. वालचंदजी संचेती, श्री. कचरदासजी पोरवाल, श्री. जयकुमार पोकर्णा, श्री. पोपटलालजी कोठारी, श्री. नेमीचंदजी कर्नावट इ. उपस्थित होते. ;सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त 7 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय व जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी अभिनेते, कवी श्री. शैलेश लोढा यांना पुरस्कार देताना त्रिशक्ति फाउंडेशनचे अध्यक्ष संभाजी पाटील, श्री. मनिंदरजीत सिंग बिट्टा, इन्स्ट्ट्यिूटचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया. ;

पुणे येथील श्री विशाल विजयकांतजी कोठारी यांचे ‘द कोठारी व्हील्स्’ या मारूती कारचे शोरूम पुणे, चिंचवड, हडपसर व नारायणगाव येथे आहे. 8 फेब्रुवारी रोजी ‘द कोठारी व्हील्स्’ चे सर्व्हिस स्टेशन मंचर येेथे सुरू करण्यात आले. या शोरूमचे उद्घाटन करतांना श्री. प्रताप वळसे पाटील, श्री. विशाल कोठारी इ. मान्यवर. ;

पुणे येथील एच.एन.डी. जैन बोर्डींग येथे स्व. नलीनचंद गांधी यांच्या स्मृतिदिना निमित्त आयोजीत व्याख्यान व छात्र पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. यावेळी मुंबईत जेवण डबे वाहतूक मंडळाचे रघुनाथ मेदगे यांनी डबेवाले ते मॅनेजमेंट गुरू या प्रवास ची माहिती सांगितली. यावेळी श्री. चकोर गांधी, श्री. सुरेंद्र गांधी इ. उपस्थित होते. ;

पुणे येथील चि. सागर संजय चोरडिया याला ‘सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्ट्ट्यिूट’ तर्फे अ‍ॅकेडमी एक्सलन्सी हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. त्रिशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. संभाजी पाटील सुर्यदत्ताचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, सौ. सुषमा चोरडिया यांच्या हस्ते चि. सागरला पुरस्कार देण्यात आला. ;पुणे येथील कर्ज देणार्‍या व्यक्ती व संस्था यांनी एकत्र येवून इनव्हेटर्स क्लब ऑफ पुणे या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत 19 फेब्रुवारी रोजी कलम 138-रिटर्न आलेले चेकवर कशी कारवाई करावी व सावकारी कायद्याचे लायसेन्स या संबंधी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र के. बोरा हे संस्थेची माहिती सांगताना स्टेजवर श्री. विमलचंद ओसवाल इ. मान्यवर. ;

महाराष्ट्र राज्याचे सचिव श्री. जयंतकुमारजी बांठीया यांनी 9 फेब्रुवारी रोजी पुणे येथे कार्यक्रमा निमित्त भेट दिली. या दिवशी श्री जयंतकुमारजी बांठीया व सौ. बांठिया यांनी उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते श्री. उत्तमजी मोहनलालजी बांठीया (मे राजेंद्रकुमार मोहनलाल बांठीया) यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. व सौ. बांठीया यांचे स्वागत करताना श्री. उत्तमजी बांठीया, सौ. ललिजता बांठीया श्री. यश बांठीया, श्री. रोशन बांठीया. इ ;


View More »